गांव कडल्या गोष्टी | अहिराणी मराठी भयकथा | लेखक – योगेश वसंत बोरसे |

 

 

 

 

 

लेखक – श्री . योगेश वसंत बोरसे .

   संध्याकाळनी येळ व्हती .म्हंजे सात वाजी  गयथात ! चारपाच लोके पारवर बशेल व्हतात! पिपयनं झाड गैर मोठ्ठ होतं ! चारी बाजूले पसरेल व्हतं ! त्या चार पाच लोकेस्मा दोन धलडा व्हतात  आनं तीन जवान पोरे!

 धलडा काय  काम करतीन?

 त्यास्न दिनभर एकच  काम चाले , दिनभर त्या झाड खाले बसानं अनं कोन येस, कोन जास , कोन कोन काय काय करस , हाइ देखानं !

 रोजना हाऊच कार्यक्रम. बरं या थलडासले बठठी खबर ऱ्हाये !  

 तर .. .. त्या दिवसबी असंच  झायं ! या चारपाच लोके गप्पा मारले लागनात ! त्यामा एक जवान तठे नवीन येल व्हता ! म्हंजे व्हता गांव मंधालाच  पण शहर गांव मा काम ले व्हता ,त्यान मायबाप आहे ऱ्हात ! अनं एक धाकला  भाऊ! तर हाऊ पका दोन रोज साठे गांव येल व्हता.

 गप्पा मारत मारत , यासनी बैठक चांगलीच चालनी. संध्याकाळनी रात कव्हे झाई कोनलेच  कळनं नई. बरं, कसं ऱ्हास , गाव शिवमा जेवण लवकर हुई जास. ज्यास्ले गप्पा गोष्टी करन्या ऱ्हातीस त्या यिसन बसतस ,अन ज्यास्ले जपनं ऱ्हास त्या जपी जातस ….

   त ….. जशी-जशी रात वाढाले लागनी, गप्पास्ना विषय बदलाले लागना ! असं बी गांव मा जास्त लाइट-बीट ह्रात न्हाई, फकस्त चावडी ना  खांब वर एक बल्ब जळत रहात! बाकी बहूत अंधार भूस …. त …..   अशा या अंधारा मा एक पोऱ्या बोलना,

 “बाबा मी ऐकं ते खरं शे का?”

 “काय रे पका?”

 “तूम्ही म्हने  भूत देखेल शे ….?”

 पका असं बोलना, अनं बाकी सगळा सावरीसन बठनात,

  “ओ, भो अरे तुले काही वाटस का? असा रातना टाइमले भूते स्ना विषय काढी ऱ्हाइना  ते ! एक त आज चावदास  शे!” 

पण पक्या काही ऐकाले तयार नव्हता, अनं तो बाबा, त्याले गहिर मोठं मोठं वाटत व्हतं !त बाबा बोलनाच,

 “अरे भूतसले का घाबरानं ऱ्हास का? त्यास्ले आसं धरानं  अनं आसं उपटी मारानं ,”

 पक्या बोलनाच, 

” म्हणजे बाबा, तुम्ही त्या भूतस्ले उपटी मारं व्हतं ? “

“तसं न्हाय रे गडा ! पन कसंय,  माणूस जीतला या भूतस्ले घाबरस ना, तितला त्या जास्त भ्यावाडतस ! अरे आज तर चौदस शे! पण त्या दिन तर अमोश्या होती, अनं मले ता म्हाईत बीनव्हतं ! दिनभर लाइट नव्हती ! रातले नऊ वाजोले लाइट उनात, मले मोटर चालू कराले वावरमा जानं  होतं, मी कसातरी दोन घास खादात अनं हातमा, एक काठी अनं कंदील लिसन, वावरकडे जावावे लागनु!……”

 “पन  बाबा ? या गोटले  कितला वरीस झायात?”

 बाबा काहीतरी इचार कराले लागना आकाडामोड कराले लागला, वर देखीसन बोलना,

 “म्हंजे असं देखा,  म्हंजे तरीबी तीस-एक वरीस झाया असतीन …..!”

“असं का ! मंग …? “

 “मंग काय? मी वावरमा गऊ, इहिर जोडे पोहोचनु, मोटर चालू करी, पन  मोटर काई चालू व्हावाले तयार नई  ! खर खर करे आन बंद पडी जाय, मले समजेना आते काय करानं ?

  मोटर तर चालू करनीच  पडीन , पन  मले काय ते समजेना !  मना एक दोस्त व्हता, तो भल्ला हुशार व्हता ! मी इचार करा, की गाव मा जाऊ, त्याले सांगू अनं उना त ठीक नई उना त सकाळले  देखु !

असा इचार करीसन मी, गावमा जावोले निघनु!”

 इतलं बोलीसन धलडा थांबना,

 “बाबा, मग काय झायं ?” तसं बाबा सांगाया लागना…

 “एक हातमा कंदील अनं एक हातमा काठी लिसन मी बागे बागे चालाले लागनु, त  काय? 

समोरुन कुणी इ ऱ्हायनं, असं मले वाटनं, तसं बी, मी कोना बापले घाबरत नई , पन  त्या रातले काय झाय, काय मालूम! मी तसेच थामनु ! मले वाटनं, हाऊ कोन शे, ओळखीना त वाटत नई , मंग इकडे कसाले इ ऱ्हायना ? ते बी आपला वावरकडे ! मी कंदील वर करा, अनं काठी जोर मा आपटी , ठोकिसन इचार, 

“कोन शे रे …..?…. उत्तर काई उं नई ! मी जोर मा इचारं ,

 “कोन शे रे” पण तिथला टाइममा तो मन जोडे इ गयथा। त्याले देखिसन मी चाट पडनू …. 

“भिका ? तू ? तू आठे काय कर ऱ्हायना ? ….. मी त्याले इचार, तो मना तोच दोस्त होता, ज्याले मोटरमधलं  समजे!

“अरे रामा मी तुन कडेच येत होतु ….!” तो मले बोलना.

” मन कडे …?  मन कडे कसाले ?”

 ” असं काय करस ? तूनी मोटर चालू कराले! ती  बंद पडेल शे ना ….? “

”  हा ते बरोबर ए , पण तुले कोन बोलनं, की  मोटर बंद पडेल शे म्हनून …?’

“अरे रामा, असं काय कर हायना, तू या टाइमले वावरमा ऱ्हास , मले मालुंग नई का ?तुले भेटाले उनथु ! अनं तुले देखं , मले वाटनं की तू नी मोटर बंद पडेल शे म्हनून ! म्हनून  बोलनू तर तेच अशीन असं मले काय मालूम? बरं, ते जाऊ दे! देखू तर खरं … काय झाय ते आं…..?”

 मी बी जास्त इचार नई करा! त्यान संगे वावर मा गऊ! तो बठ्ठ चेक  करा ले लाग गया अनं काही तरी करं !…. मले त काई बी उमजत नव्हतं ! मी त्याले सांगं – 

” भिका हाई देख ! आपन सकाळ ले , इसन करूत ! आते अंधारमा डोया फोडाने काम नई!” 

तर तो मलेच बोलना, 

“रामा काई कामे  रात ना अंधारमा च व्हतेस !”

 “अरे भिका, पण हाई काम आतेच कराले पाहिजे असं काई नई ….!”

” रामा, तू गैर बोलंस गडा ! दोन मिनिट जरा दम मार नं ! “

..मी कई बोलनू नई मग ! त्यान काय करं काय मालूम ?….. दोन मिनिट मा मोटर चालू झाई ! मले बी बरं वाटनं ! मी पिकंसले पाणी सोंड, अनं त्याले बोलनू,

 ” भिका , तून पैसा मी सकाळले देस, आते खिसामा दमडी बी नई ए!”

 “रामा अरे तुले आते कोन पैसा मागी ऱ्हाईनं  ? काल दिन देजो ! बरं …मी जास….!” तो मले बोलना.

“अरे, तू आते कथा  जाई रायना? चल संगे घर जाऊ!” 

“अरे रामा मले जरा काम ए ! तू जाय ! मले टाइम लागीन….!”

 असं म्हनीसन तो भरभरा चालना गया। मी मन काम करी लिधं अनं तथा इन निघनु !…..”

“मंग काय झायं ?”

 “….मंग मी घर गऊ अनं जपी गवू ! सकाळले उठनू तर ध्यान मा ऊनं , अरे ? आपले त्या भिकाना पैसा देवानाएत ! बिचारा रातले इसन मोटर न काम करीसन गया ! 

मी कपडा बदला ,न, बायकोले सांगं,

 “मी येस जरा!” ती मले बोलनी,

 “अवो, अंग तोंड त धुवा!”

 “न्हाई मी येस जरा!” 

……मी भिका ना घर गऊ !

 “भिकाऽऽऽ”

 मी त्याले  बलावं तो उना !

 “काय रे रामा ? आज सकाय सकायलेच ? मनकडे ? काही काम व्हतं का ….? “

 मी खिसामाधून पैसा काढात  अनं त्याले दिधात,

 “या तूना पैसा!”

 तो मले इचाराले लागना ” कसला पैसा?”

“तू बी कमाल करस भिका ! रातले काम करं ! इसरी बी गया?…”

”  अरे रामा तू काय सांगी हायना मले काई बी उमजत नई गडा ! मी तर कालदीस ना घर मा पडेल शे ! कामनी वाट देखत ! रातले जपनू आने आते उठनू ! …. “

“भिका, मजाक नको करु गडा ….! ….तू मना वावर मा उना अनं मोटर चालू करीसन चालना गया…… मी तूले इचारं बी कथा जाइ रायना तर तू बोलना मले काम शे, टाइम लागीन म्हणून……”

पण गडास हो, भिकाले काय बी उमजेना, तो त्यान बायकोले आवाज देवाले लागना

 “शेवंते, शेवंतेऽऽऽ…”

 शेवंता वैनी आमना पान उनी …..

“दादा…. तूमी ….? आज सकाये सकाये….. ? बठा ….. मी चहा टाकस…… !”

” शेवंते ते जाऊ दे! मी रातले कथा गय थू ? “

 ” ….अया बया ? असं काय चावइ राइनात? घर मा तर पडेल व्हतात !……”

तो मन कडे देख्याले लाग गया। 

” झायका  तूनं समाधान …? रामा मले आते खरं खरं सांग…! काय झाय काल रात ले…?…”

” भिका मी जास गडा, मले कस तरी हुई ऱ्हाईनं….” 

“अरे रामा पन झाय काय ते तर सांग !” 

अनं मी त्यासले बठ्ठ सांगं, जसं घडनं तसं ना तसं… , त्या दोघेसले उमजेना, की असं कसं झाय ते ….? अनं मले बी नई….!..”

“अवो, एक सांगू का….?” 

शेवंते वैनी बोलनी

 ” मले वाटस हाई काइ तरी येगळंच शे…..”

 आमले समजनं नई !

 “दादा हाई देखा , काल अमावस ना दिस होता ! या रातले भूते-चुलडीनी मोक्या  ह्नातस म्हने….  त्यास्न  बोलनं ऐकिसन मी हसाले लाग गऊ….

“वैनी असं काइ ह्रास  का …. ? तूमी काइ बी चावयतीस….” 

“मंग तुमीच सांगा दादा ….काय होतं ते….? तूमी हाशी रायनात पण तुमनी एक गोष्ट ध्यान मा नई उनी, तूमी रातले ज्याना संगे व्हतात तो जित्ता नव्हता!….” 

 मी काय बोलणार ? मना सात गयात अन पाचच ऱ्हाइनात ! 

मी तथा इन इचार करत करत घर उनु  अनं जपी गऊ ! डायरेक्ट संध्याकायले उठनू ! ती मले बोलनी ,…

“का ओ? इतलं कोनी जपंस का ?  चला आंग धोवा, मी जेवाले वाढस……”

मी जेवण करं, अनं थोडा वेळ इचार कराले लागनू ! पण काइ डोकू चालेना ! ती इचाराले लागनी ,

काय झाय म्हणुन, तीले काय सांगनार?……

 “बरं तूमी वावरमा जानारेत का ?….”

 “….. मंग जानच पडी ! “

 ” कितला वाजनात ? ” 

” आते ….- आते ८ वाजनात …..”

 “बरं मी निंघस!” 

” त्या बैटरी मा शेल टाकात का?….” 

” कोन टाकीन? तुमी लयनात का…?

“…. बरं जाऊ दे  कंदील पेटाड, अनं काठी दे….”

मी कंदील अनं काठी लिसन वावर कडे जावाले लागनू …..

” मी काय म्हनस , असं कवय बी उठीसन वावर मा नका जात जाऊ … काल ना दिन अमावस्या व्हती … काई झायं मंग काय करशान…..?

” काय होनार ए  ….. जे व्हवानं होतं ते झायं …..”

” म्हनजे ..?”

” काई नई व … जास मी …… ” 

” आओ पन ….. “

मी लक्ष दिधं नई …… 

  वावरमा गऊ ! मन काम करं, अनं घर जावाले निघनु …..

” मंग ? “

 “अरे मंग काय गडा ….! त्या रामचंद्र तात्या ना वावर जोडे दोन तीन जण बशेल होतान। मी त्यास्ना कडे देखं त्यास्नी मन कडे !…

 …. त्या बीडी फुकत होतान मी ध्यान दीधं नई !…

…. बागे बागे पुढे चालाले लागनू। तसा एक जण मन मांगे उना….

 “आर  भो, अरे मन पैसा देना ….! “

मी त्यान कडे देखाले  लागनू…

” “भिका?….” 

“…..अरे भो अरे मन पैसा देना….! तून काम झाय त मन कडे देखाले बी तयार नई….? “

 दुसरा दोघे बी उनात एक बोलाले  लागना….

 “तून पान बीडी शे का ?……” 

मी घाबरीसन सांगं “नई भो” 

…..कारण मन ध्यान त्यास्ना तंगडास कडे गय थं ….. मले काइ येगळंच वाटनं…..! 

” बरं तंबाखू ? …..”

 तिसरा बोलना….

 ” …नई रे भो,…. मी नई खात….? “

“तूं नई खात पण आमले लागस ना ! काल दिन ध्यान मा ठेव जो ! एक बीडी न बंडल अनं तंबाखू नी पुडी !…. अनं याना पैसा देजो ….आमले बी बिडी काडी लागस ……त्यासाठे पैसा लागतंस …..!….तुमि लोके तं आमना काई इचार करतात नई ….” 

” म्हनजे …?”

मले काई कळनच नई …. एक तर जीव घाबरत होता … त्या मन जोडे उभा होतात .. पन असं वाटे … त्यासना आवाज असा दूर कथाईन येत व्हता … मना हातपाय थरथर करंत व्हतात …..

 त्या बठ्ठा वारा नं गत हालत व्हतात …..  अनं पाय तर दिसेचनात! मी कसातरी खिसा मधून पैसा काढान अनं त्याले बोलनू 

…” हाइले तून पैसा !…..”

तो हात पुढे कराले लागना !…..

 अनं काय सांगू…?

 …. त्याना हात ना जागावर नुसता हाडे होतात … मी पैसा दिधात पण त्या खाली पडनात!….. 

“अरे भो अरे हात मा देना ! “

आते काई खरं नई गडा … पया …… 

मी पळाले लागनू….

 तसा त्या मन मांगे येवाले लागनात …अनं मन संगे पळाले लागनात …

….अनं जसं  गाव जवळ उनं…  गायब झायात !…. 

 मी कसातरी गांव मा घुसनू ! 

मले दम लागेल व्हता …

मी तठेच एक ओटावर बठी लिधं !….

….. अनं त्या दिनपान रातले वावर मा जानं बंद करी टाकं !…. 

आपला शोक पानी चांगला नैत गडा ….  हाई असं फिरनं पडंस !…. भूत हुईसन !….”

 …..इतलं बोलीसन बाबा शांत बठना पका बोलना, 

“म्हंजे बाबा त्या बठ्ठा  भूते होतात ….!”

” अरे पका नाहीतर काय…? अरे या भूते कोनं  बी रूप ली सन येतस म्हने…!” 

“असं का?….”

त्यासनं बोलनं झायं , अनं दुसरा धलडा बोलाले लागना,-

 “अरे पका, हाइतर काइच नई …! मी जे देखं ते तू ऐकशीन तर तूनी एवढी मोठी फाटी जाईन….!”

तसा बाकी दोघे बी इचाराले लागनात 

“काय रे भो आबा…. ?” अनं आबा गोट  सांगाले लागनात !……..

 सूचना :- इथे ही गोष्ट संपते !

आबा जी सांगतात ती पुढील गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल .. ती पण तयार आहे ! तुम्ही तयार आहात का ? सांगा .. 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top