हिरोईन | मराठी भयकथा | Actress | Marathi Horror Story | Yogesh Borse

हिरोईन :- मराठी भयकथा

 

   आगामी मराठी भयकथा 

Sample :- 

लेखक :- श्री . योगेश वसंत बोरसे .

 हस्त नक्षत्राच्या मुसळधार पावसात ती चिंब भिजली होती . छत्री होती पण त्या छत्रीचा काही उपयोग झाला नव्हता . हवे मुळे छत्री दोन तीनदा उडता उडता राहिली . शेवटी तिने कंटाळून छत्री बंद केली . आणि एका झाडाखाली आश्रय घेतला . पण तेवढ्या काही क्षणांनी तिला अपादमस्तक  भिजवलं होतं .

आधीच असलेला रेखीव बांधा चिंब भिजल्याने एखाद्या शिल्पासारखा दिसत होता .. अगदी आखीव रेखीव !

रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा तिच्यावर खिळत होत्या . आपण का थांबलो आहोत हे तिला ही समजत नव्हतं . लोकांच्या नजरांनी तिला लाजल्याहून लाजल्यासारखं झालं !

‘ निघावं का ? असं ही भिजलोय आपण आणि पाऊस थांबेल असं वाटत नाही .’

 संध्याकाळ झाली होती . एवढ्या मुसळधार पावसात सूर्य दर्शन शक्य नव्हतं . पण सूर्य नक्कीच मावळला होता . घड्याळ होतं पण बहुतेक पाणी गेल्याने बंद पडलं असावं . अंधार पडायला सुरुवात झाली होती . थंडीमुळे अंगावर शहारे येत होते . अंग थरथरत होतं . ती निघाली ….

… आणि मागून आवाज देत एक रिक्षावाला जवळ येऊन थांबला ,जणू काही तिची निघायचीच वाट बघत होता .. समजा तिला जरा वाट बघून नंतर रिक्षा मिळाली असती तर काही वाटलं नसतं . पण निघालो आणि लगेच मागून आवाज आल्याने विचारांनी वेगळं वळण घेतलं …

” मेमसाब ,कहाँ जाना है ? “

तिने पत्ता सांगितला .. पण रिक्षा वाल्याचा अवतार बघून तिची  बसायची इच्छा होत नव्हती . रिक्षावाल्याने  मिटर टाकलं .

” बैठीए !… “

ती बसली नाही .

क्या हुआ मेमसाब ? चलीये ,मीटर शुरु हो गया है … “

” नही ,जाने दॊ ! “

” पर हुआ क्या वो तो बताव ?”

” नही, मुझे नही जाना है ! “

” लेकिन आप ने तो ऍड्रेस भी बताया  ? “

” जाना है पर आप के साथ नही जाना है ! “

” क्यो ?”

” पता नही ! पर …. जाने दो …. “

” मॅडम ,डरिये  मत ,मै दिखता कामिना हूँ ,पर हूँ नही ! मेरे भी बीबी बच्चे है, संसार है ,जिम्मेदारी है ! पॅसेंजर को अपना भगवान मानता हूँ !आप पर आनेवाली कोई भी मुसीबत पहले मुझपर आयेगी . घबराईये मत बैठिये ! “

त्याचं बोलणं ऐकून तिला थोडं आश्वस्त वाटलं . ती बसली आणि रिक्षा निघाली .. तिची नजर समोर होती आणि त्याची आरशातून मागे !

” मॅडम ,एक बात पुछू ?”

” क्या ?”

” आप बला की खूबसूरत है ! हिरोईन है या मॉडेल ? और ऐसे  पैदल क्यो घूम रही है  ? “

” भाई साब ,आप अपना काम किजीये और मेहेरबानी करके आगे  ध्यान दिजीए ,वरना मुझे मजबुरन उतरना पडेगा ! “

” अरे नही नही … आप तो बुरा मान गयी ! पर देखिये मेरी बात मानिये ,लगता है आप इस शहर में  नयी है ,इस शहर से अंजान है ,लेकीन ऐसे वक्त बाहर मत रहा कीजिये। यहाँ कोई किसी का नहीं है ,सब तमाशाई है ! समझो अगर आप पर  कोई मुसीबत आई तो भी आप की कोई मदद नहीं करेगा। .. “

” मै समझी नहीं ? चलती रिक्शा में क्या मुसीबत आएगी ? “

” तो फिर आप किस बात से डर रही थी ? आप को क्या लग रहा था की मै आप के साथ कुछ गलत करूँगा ?”

” …. “

” मैडम आप अभी चिल्लाकर देखिये ,किसी को आवाज देकर देखिए ,कोई कुछ नहीं कर पायेगा आप के लिए। . ?”

” क्यों ?”

” अरे इंसान जीते जी किसी की मदद नहीं करता ,मरने के बाद क्या ख़ाक करेगा ? ?”

” मै समझी नहीं ! “

” मेमसाब ये मुर्दो का शहर है ! “

” क्या ?”

तिला आश्चर्य वाटलं आणि दुसऱ्याच क्षणी ती जोरजोरात हसायला लागली . तिचं हसणं अतिशय मोहक होतं . रिक्षावाला बघतच राहिला . हसता  हसता तिच्या डोळ्यांत पाणी आलं .

” क्या भाईसाब आप भी ,अच्छा मजाक कर लेते हो  ! “

” ये मजाक नहीं सच्चाई है ! मैडम यहाँ कोई किसी की मदद नहीं करता ! वरना मै आज इस हाल में नहीं होता ! “

” क्या मतलब ?”

” छोड़िये मैडम ,मतलब जानकर अब क्या करेगी ?

 जो किसी की मदद नहीं करते उनका जिन्दा होना भी लाश के समान है ! जिन्दा लाशे है इस शहर में ,जो इधर उधर  घूमती है ! किसी का खून चूसती है ! किसी की मेहनत ,किसी का पैसा तो किसी की इज्जत !

 इन्हे किसी से कोई हमदर्दी नहीं ! सरोकार नहीं ! बस ,अपनी जरूरते ,अपनी हवस ,अपने इरादे , खुद के लिए जीते है और एक दिन कीड़े मकोड़ो की तरह मर जाते है !

तो ऐसे लोगो का जिन्दा होना भी किस काम का ? “

 त्याच्या बोलण्यातील गर्भितार्थ समजून तिचं हसणं बंद झालं . वातावरणातील ताण विनाकारण वाढला होता . तिचा ही मूड बदलला होता . अचानक असुरक्षित पणाची भावना बळावली .

‘ म्हणजे आपल्याला याच्या पासून ही धोका आहे ?’

” भाई साब ,रुको ! मुझे यही उतरना है ! “
” नहीं मेमसाब ! अब ये वही रुकेगी जहाँ इसे रुकना है ! “
” देखो ,बदतमीजी मत करो , रिक्शा रोको ,मुझे उतरना है ! “
” मैंने कहाँ ना  मैडम ,अब ये वही रुकेगी जहाँ इसे रुकना है ! आप चुपचाप बैठे रहिये ! कुछ नहीं होगा ! कोई आप की इज्जत नहीं लूटने वाला ! बस चुपचाप बैठे रहिये ,मै हूँ ना ! “

 

 तिने बाहेर डोकावून आवाज दिला … दोन तीन जणांना सांगितलं पण कुणी तिच्याकडे साधं बघितलं ही नाही …

‘ काय मूर्ख लोक आहेत ? एका मुलीला मदत करू शकत नाहीत ? की त्यांना शक्य नाही ? म्हणजे हा बोलला ते खरं तर नाही ? की  हे खरोखर मुडद्यांचं शहर आहे ?’

…. रात्र वाढत गेली ,अंधार गडद होत गेला . रस्त्यावरील एक ही स्ट्रीट लाईट जळत नव्हती .

‘ इतका वेळ का लागतोय ? आपण तर दहा पंधरा मिनिटात पोहोचायला हवं होतं ? ‘

”  भाई साब ,आप जान बूझकर रिक्शा घुमा रहे है ! मै तिस रुपये से ऊपर एक रूपया नहीं दूंगी ! “

” मेमसाब ,आप से पैसे कौन मांग रहा है ? वैसे भी पैसे निकालना मुझे आता है ! “

” आ गए न अपनी औकात पर ! मै पहले ही समझ गयी थी की तुम अच्छे इंसान नहीं हो ! “

” सही है मेमसाब ! मै दीखता भी कमीना हूँ और हूँ भी कमीना ! अभी चुप चाप बैठी रहो वरना इधर ही ठोक दूंगा ! “

तिला एक लक्षात आलं ,आता आपल्याला वाचवणारं कुणी नाही ! जे काही करायचं ते आपल्यालाच करावं लागेल . तिने विचार करता करता पर्स उघडली . आणि काही मिळतं का शोधू लागली .

 हातात आलेली वस्तू बघून तिच्या डोळ्यात अमानुष चमक आली . मोबाइल चार्जिंग ची usb cod ! तिने क्षण ही वाया न घालवता वायर रिक्षा वाल्याच्या गळ्यात टाकली आणि खेचली !

काळजाचा थरकाप उडाला !

वायर रिक्षावाल्याचा गळ्यातून आरपार गेली .

” मैडम ,मरे हुए को क्यों मार रही हो ?”

” इम्पॉसीबल ! ऐसा हो नहीं  सकता  ! “

” क्या हो नहीं सकता ? मेमसाब मुझे मरकर पांच साल हो चुके है ! “

” नहीं ! ये कोई साजिश है , मुझे डराने की ! लेकिन मै डरने वाली नहीं ! “

” क्या है न मेमसाब आप भी मरने वाली है ! डरो चाहे न डरो ! “

” मै क्यों मरूंगी ? मैंने अभी देखा है क्या है ? “

” क्या देखना चाहती है ? मौत तो देख ली सामने ! “

” देखो तुम कौन हो ,ये सब कैसे कर रहे हो मुझे पता नहीं ! पर मुझपर दया करो नहीं  तो मै कूद जाऊंगी ! “

” कूद सकोगी ? कही हाथ पैर टूट गया तो जिंदगीभर भीख मांगती फिरोगी ! “

” पर तुम चाहते क्या हो  ?”

” तुम्हे  मेरी प्यास बुझानी होगी ! “

” क्या ?”

” अरे तुम समझ रही हो वो नहीं ,मेरा दूसरा काम है ! “

ती काहीच बोलली नाही .

” तुमने अपना नाम नहीं बताया ?”

” जानवी ! “

” सही नाम बताओ ! “

” नीलिमा। .. “

” तो नीलिमा जी मै आप को आपके अड्रेस पर छोड़ देता हूँ ! कल हम फिर मिलेंगे ! “

तिच्या जीवात जीव आला . उद्याचं उद्या बघू !

तिच्या मनातील त्याने ओळखलं असावं . त्याच्या चेहेऱ्यावर गूढ हास्य चमकून गेलं . पण तो ही काही बोलला नाही .

काही वेळाने रिक्षा तिच्या ऍड्रेस वर पोहोचली . तिने पैसे दिले . त्याने काही न बोलता पैसे खिशात टाकले .

” कल शाम को इसी वक़्त तैयार रहना ! मै आऊंगा ! “

तो नीलिमा कडे बघत म्हणाला आणि निघून गेला .

त्याच्या नजरेने ती अंतर्बाह्य थरारली . आपण सुटलो की अडकलो ? … तिला काही कळत नव्हतं .. थंडी भरली होती ती वेगळीच . पटकन रूम कडे निघाली . दोन तीन पावलं गेली असेल नसेल ,आपला कुणी पाठलाग करतंय ,आपल्यावर कुणी पाळत ठेऊन आहे असं तिला जाणवलं .

उद्देश ?

सांगण्याची गरज नव्हती ! मूर्तिमंत सौंदर्य काय असतं ते जाह्नवी अर्थात नीलिमा कडे बघून कळत होतं .. आपल्या सौंदर्याचा गर्व करावा की तिरस्कार ? तिला कळत नव्हतं ..

” कोण ए ?”

तिने मागे वळून रागाने विचारलं .

“उद्या ची संध्याकाळ तुझी …. ” थंड आवाजात उत्तर आलं ..

” मी विचारलं कोण ए .. ?”

उत्तर मिळालं नाही . नीलिमा भराभर निघाली . तिची धडधड वाढली . उर धपापत होता ! ती भराभर पायऱ्या चढून वर आली . घाईघाईत कुलूप काढलं . दार उघडलं . आत जाऊन दार बंद केलं आणि येऊन सोफ्यावर पसरली …. दोन मिनिटं झाली . तिला भान आलं की आपण ओले आहोत … लक्ष घड्याळाकडे गेलं …

७:१५ वाजले होते ! ती भयंकर दचकली !

आपला जितका वेळ बाहेर गेला त्या प्रमाणे नऊ ,साडे नऊ व्हायला हवे होते …

‘ How  It ‘s Possible ? ‘ 

पर्स मधून मोबाइल काढला . 7:17 pm ! 

तिने मोबाईल सोफयावर फेकला . डोकं गच्च दाबून बसली . डोकं दुखायला लागलं होतं ….

 कारण अर्थात पावसात भिजल्याने !

 कपडे चेंज करणं गरजेचं होतं की आधी चहा घ्यावा ?

 विचार करता करता ती कपडे घेऊन बाथरूम मध्ये गेली . अंगावरील ओले कपडे काढले …

” Gorgeous… ! “

तोच थंड आवाज काळजाच्या आरपार गेला .. तिने घाई घाईत टॉवेल गुंडाळला . आणि घाबरून विचारलं …

” कोण ए ? समोर का येत नाही ? “

” येऊ ? खरंच समोर येऊ ? पण तू तर …. “

तिला आपल्या अवस्थेची जाणीव झाली . आणि या अवस्थेचा भयंकर संताप आला …

” घाबरू नकोस ! तुला माझ्या पासून काहीही धोका नाही ! पण तुझा जीव धोक्यात आहे आणि तो कसा वाचवता येईल हा विचार करतोय ! “

तिला समजलं नव्हतं कोण बोलतंय ते ?

पण त्या आवाजात धीर होता ! हिंमत देण्याची ताकद होती . कपडे घालून ती बाहेर आली इकडे तिकडे पाहू लागली …

” हे बघ .. तू कोण आहेस मला माहित नाही ! समोर का येत नाहीस ?”

” माझं समोर येणं तुला झेपणार नाही . हे बघ तुझा जीव धोक्यात आहे . तू आत्ता हे शहर सोड ! “
” पण का ? मी का जाऊ ?  आणि मला मारून कुणाचा फायदा होणार आहे ?”
” तुझं उद्या ऑडिशन आहे ना  ?”
” हो !  त्यासाठीच तर मी आलेय ! “
” मग उद्या ऑडिशन ला जाऊ नकोस ! “
” का ?”
”  तुझ्या जीवाला धोका आहे ! “

ती आता वैतागली होती . स्वतःभोवती फिरून चक्कर यायला लागली होती .

” काय सारखं तेच तेच ! मी जाईन ऑडिशन ला ,बघू कोण काय करतं ते ! “

” Ok As You Wish ! ” नंतर शांतता पसरली . जीव घेणी शांतता !

” हॅलो … उत्तर का देत नाही … ? “

अति विचाराने डोकं भणाणलं . ती किचन मध्ये गेली .. फ्रीझ मधून दूध काढलं आणि चहा ठेवला . चहा घेऊन बाहेर हॉल मध्ये आली … सोफ्यावर विसावली . चहाची सिप घेत घेत मोबाईल उचलला .. पण मोबाईल बंद होता … चार्जिंग संपली असावी … तिने मोबाईल चार्जिंग लावला …. पुन्हा चहा घेत बसली …

‘ कोण असेल ?

काय प्रकार आहे हा ?

तो रिक्षावाला ?

तो कोण होता ?

आणि मेलेला होता तर रिक्षा कसा चालवत होता ?

आणि आपल्याला का वाटलं की तो मेलेला आहे म्हणून ?

कदाचित वायर घाईघाईत त्याच्या गळ्यात अडकलीच नसेल ?’

हीच शक्यता जास्त होती .

आणि तो उद्या यायचं म्हणाला होता . त्याचा आपला काय संबंध ?

आपला पाठलाग कोण करतंय ?

आपल्यावर लक्ष कोण ठेवतंय … ?

आपल्याला कोण मारणार आहे ?

काय करावं ?

कुणाला सांगावं ?

पोलिसांना सांगावं की .. पण पोलीस आपल्यालाच विचारतील की तुमची कुणाशी दुश्मनी आहे का ,वैर आहे का म्हणून ?

 काय सांगायचं …?

 तोवर चहा संपला होता … ती सोफ्यावर  मान टेकून विसावली …  आणि फिरणाऱ्या फॅन कडे बघता बघता आपल्या भूतकाळात हरवली …  .. बाहेर पाऊस कोसळतच होता .. आणि त्या पावसात ….

To Be Continued …. 

 

 ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE & BGSM PRODUCTION ,BHUTATMA PUBLICATION 

BHUTATMA PUBLICATION

➣➣➣➣➣

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top