सिद्धी :-
मराठी भयकथा :- आगामी प्रकाशित होणाऱ्या कादंबरीचा एक भाग

लेखक :- श्री . योगेश वसंत बोरसे .
” हॅलो सर ,एक मिनिट – “
रमाकांत ने दचकून मागे बघितलं . रमाकांत जवळच्याच एका अपार्टमेन्टमध्ये राहत होता . रात्रीचं जेवण करून शतपावली करण्यासाठी ,पाय मोकळे करण्यासाठी तो निवांतपणे बाहेर रस्त्यावर फिरत होता . तो मागे वळेपर्यंत ती व्यक्ती हाताच्या अंतरावर येऊन थांबली . पण त्याचा चेहेरा नीट दिसत नव्हता .
” सर जरा एवढा ऍड्रेस सांगा ना . ”
त्याने हात पुढे केला . हातात कागद होता . आणि कागदावर लाल अक्षरांची जुळवाजुळव केली होती . रमाकांतला त्या अक्षरांचा अर्थ लागत नव्हता . त्याचं डोकं गरगरायला लागलं .
समोरच्याचं काम झालं होतं . रमाकांत ने त्याला हातवारे करत अडखळत ऍड्रेस सांगितला . तसा समोरचा वेळ न घालवता त्या रस्त्याने गेला . आणि अंधारात गडप झाला …..
…..रमाकांत तिथेच थांबला .
त्याला कळेना ?
आपल्याला नेमकं कुठं जायचंय ?
त्याने डोकं गच्च दाबून धरलं आणि रस्त्यावरच खाली बसला .
काही वेळात समोरून एक गाडी आली हॉर्न वाजवला पण रमाकांत जागचा हलू शकला नाही . ड्राइवर चांगला असावा . तो खाली उतरला . रमाकांतच्या जवळ आला ,त्याच्या खांद्यावर हात ठेवला .
” कोण रे बाबा तू ?
काय होतंय ?
असा रस्त्यात का बसलास ? ” …..
पण रमाकांत काही बोलण्याच्या परिस्थितीत नव्हताच . तो जागीच कलंडला ,आडवा झाला . ड्राइवर घाबरला ,इकडे तिकडे बघितलं ,आपल्या शिवाय इथे कुणी नाही हे पाहून तो एक क्षण ही वाया न घालवता तिथून पसार झाला .
काही क्षण असेच गेले .आणि अचानक …. रमाकांत उठून बसला . आणि सरळ चालायला लागला अगदी यंत्रवत पणे … त्याची नजर स्थिर होती . ज्या दिशेने ऍड्रेस विचारणारी व्यक्ती गेली होती त्या दिशेला रमाकांत निघाला आणि अंधारात गुडूप झाला . ….
….अकरा वाजून गेले तरी रमाकांत घरी पोहोचला नाही . त्यामुळे नीलिमा विचारात पडली .नीलिमा ,रमाकांतची पत्नी . तिला काळजी वाटायला लागली . चिडचिड व्हायला लागली .
” एवढा वेळ कोणी फिरायला जातं का ? जायचं तर मला ही सोबत न्यायचं होतं . किती वेळ वाट बघायची ? “
ती स्वतःशीच बडबडत राहिली . आणि जसा वेळ जायला लागला तशी काळजी ही वाटायला लागली .
‘ काय करावं ? शोधावं का ? की पोलिसांना फोन करावा … ? ‘
निर्णय होत नव्हता . घरात थांबवत नव्हतं आणि बाहेर पाय निघत नव्हता . बघता बघता १२ वाजून गेले . आणि….
दारावरची बेल वाजली !
तशी नीलिमा एकदम दचकली .
आत्यंतिक भीती आणि आनंद ,बेचैनी ,आवेग उफाळून आला आणि धावत जाऊन दरवाजा उघडला तर समोर …. तोच होता ! पण काहीतरी खटकत होतं वेगळं वाटत होतं काय ते तिला ही समजत नव्हतं .
तो दाराबाहेर ,ही घरात !
” आत येऊ का ? “
” म्हणजे ? ”
नीलिमा गोंधळली . हा असं काय विचारतोय ? याचंच घर आहे ना ?
” मी म्हटलं आत येऊ का ? ‘
” अरे असं काय विचारतोएस ? तुझच घर आहे ना ? “
” मग दार अडवून का उभी आहेस ? येऊ दे ना ? “
नीलिमा आपसूक बाजूला झाली .
” अरे किती वेळ ? ही काही पद्धत आहे का शतपावली करायची ? मला ही सोबत न्यायचं होतं ! वाट पाहून पाहून कंटाळले . आणि काळजी वाटायला लागली . … “
रमाकांत एक शब्द ही न बोलता बेडरूम मध्ये शिरला आणि बेड वर आडवा झाला .
” अरे मी तुझ्याशी बोलतेय . आणि तुझ्या आवाजाला काय झालं ? असा विचित्र का येतोय ?”
तो अवाक्षर बोलला नाही ! नीलिमा दार बंद करून त्याच्या मागे मागे बेडरूम मध्ये आली होती . पण रमाकांत भिंतीकडे तोड करून अर्थात नीलिमा कडे पाठ करून झोपला होता .
” अरे मी तुझ्याशी बोलतेय … “
नीलिमा ने त्याला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला . रमाकांत ने पाठ फिरवली ,एक तीक्ष्ण कटाक्ष नीलिमाकडे टाकला तशी ती अंतर्बाह्य थरारली .
” झोप आता ! … “
‘ हा … हा आपला रमा नाही ! हा मुद्दाम करतोय की काही झालंय ? आपल्या शिवाय तर हा कधीच झोपला नाही ?
मग आज …..
विचार करता करता तिला कधी झोप लागली समजलं ही नाही …….
जाग आली ,ती काहीशा विचित्र आवाजाने !
नीलिमा वाटलं आपण स्वप्नात असू किंवा आपल्याला भास झाला असेल .
पण नाही !
आवाज अगदी जवळून येत होता . कुणीतरी काहीतरी पुटपुटत होतं . तिने घाबरत घाबरत हळूच रमाकांत झोपला होता ,त्या दिशेला बघितलं . रमाकांत उठून बसला होता ,त्याची नीलिमा कडे पाठ होती आणि तो कुणाशी दबक्या आवाजात ….
तिचं लक्ष त्याच्या पलीकडे गेलं . एक आकृती होती ! हालचाल जाणवत होती .
निलीमाची चाहूल लागताच ती आकृती रमाकांतच्या आडून डोकावू लागली आणि निलीमाला वेड लागायची पाळी आली . आता रमाकांत ही तिच्या कडे बघत होता . पण नजर रमाकांत ची नव्हती .
ती आकृती एका बाईची होती !
म्हातारीची होती !
पण केस काळेशार दिसत होते !
मोकळे होते !
सगळंच विचित्र होतं . शरीर तोडकं मोडकं होतं . म्हणजे कधीही कोसळून पडेल असं !
पण आता ती नीलिमाच्या दिशेने सरकत होती !
लिट्रली सरकत होती !
जसं काही तिच्यात त्राण नव्हतं . तिचं भीषण स्वरूप बघून नीलिमा ओरडायला लागली . पण तिला जागचं हालता येत नव्हतं .
आता रमाकांत म्हणून जो कुणी होता त्याची नजर तिच्या शरीरावरुन फिरायला लागली . त्या नजरेने ती जशी काही बद्ध झाली होती . बांधली गेली होती .
ती म्हातारी दात विचकत विचित्र हावभाव करत ,आपलं शरीर गोळा करत नीलिमाच्या जवळ पोहोचली . नीलिमाचं डोळे भयाने पांढरेफट पडले .
‘ मृत्यू ?….. असा ?…. इतका …. भयानक ….. ? ‘
म्हातारीने तिच्या अंगावरून हात फिरवायला सुरुवात केली . नीलिमा ला दिसत होतं पण स्पर्श जाणवत नव्हता . तिच्या अंगाप्रत्यांगावरून म्हातारीचा हात फिरला आणि नीलिमाचं डोळे जड झाले ,तिला गुंगी यायला लागली .
जे काही होतंय ते चुकीचं होतंय हे समजून ही ती काही करू शकत नव्हती . तिला झोप यायला लागली ! प्रचंड झोप ! …. काळ झोप …. जणू काही मृत्यूच … ! हो … पण मग …….
… किती वेळ … किती तास ….. किती दिवस …. किती रात्री … ती झोपली होती तिला माहित नव्हतं . पण जेव्हा उठली तेव्हा अगदी ताजतवानं वाटत होतं !
मनातली भीती कुठल्या कुठे पळाली होती !
तरी काही विचित्र असंबद्ध वाटत होतं . तिने आरशात बघितलं तिला स्वतःची ओळख पटली नाही !
मनात गोंधळ माजला होता .
‘ आपला चेहेरा ओळखीचा का वाटत नाही ? आणि शरीर ही …? ‘
तिने आपल्याच शरीरावरुन हात फिरवून पाहिला . आपल्याला नवीन शरीराची इच्छा होती ना ?
पण मग शरीर चांगलं मिळालं तसा चेहेरा का नाही ?
चेहेरा विसंगत का वाटतोय ?
आपल्या पहिल्या चेहेऱ्यासारखा ….
तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं . आणि स्मृती काही अंशी जागृत झाल्या . पण डोक्यात सणक गेली ती गच्च डोकं दाबून बसली . डोळ्यापुढे घडलेल्या घटना एका मागे एक येऊन गेल्या . एखाद्या चलचित्रासारख्या ……
तिला आपला चेहेरा ओळखीचा वाटू लागला . डोळ्यासमोर म्हातारीचा चेहेरा आला
‘ याचा अर्थ जी कुणी म्हातारी होती तिने आपलं शरीर धारण केलं ?
पण हे शरीर तर आपलं वाटत नाही ?
चेहेरा ही आपला नाही !
आपण नेमके जिवंत आहोत की मेलोय ?
तिने पुन्हा आपल्या शरीरावरून हात फिरवला !
” नाही ! आपण आता नीलिमा राहिलो नाही ! हे शरीर ही आपलं नाही आणि चेहेरा ही आपला नाही ! फक्त स्मृती …… डोकं भणाणलं …. मेंदूत पुन्हा सणक गेली ……
….नेमकं काय झालं कळायला मार्ग नाही . पण तिला आता वेगळाच वाटायला लागलं …. जाणिवा बदलल्या होत्या . भीड चेपली होती . आणि आता शरीर भोगासाठी आतुर होतं . तिची नजर घरभर फिरत होती . पण रमाकांतचा कुठे पत्ता नव्हता . तिच्या डोक्यात नको तो विचार आला !
आपल्या सारखाच रमाकांत ही बदलला असेल तर …. आपण त्याला कसं ओळखणार ?
तिने पूर्ण घरभर शोधलं ,तिच्याशिवाय घरात कुणी ही नव्हतं …. अंघोळ करावी का ? ….
ती बाथरूम मध्ये गेली . शॉवर सुरु केला आणि मनसोक्त स्नान केलं .. जशी काही जन्माची पारोशी होती ….. किती वेळ गेला कुणास ठाऊक ?
तिला आता उग्र वास यायला जो तिला हवाहवासा वाटत होता …. त्या वासाने ती धुंद झाली . तिने कसे तरी कपडे चढवले आणि बाहेर आली . किचन मधून आवाज येत होता . ती किचनकडे गेली . आत कुणीतरी पाठमोरं उभं होतं .
त्याने तिच्याकडे लक्षही दिलं नाही किंवा त्याला तिची दाखल घ्यायची गरज ही वाटली नाही . पण त्याच्या अस्तित्वामध्ये अशी काही जादू होती की तो कोण आहे काय करतोय हे बघायची तिला गरज वाटली नाही .
ती त्याला मागून बिलगली . तसा तो उद्गारला ….
” उठलीस … ?”
तिचं लक्ष ओट्यावर गेलं . ओट्यावर मांसाचे तुकडे होते आणि तो ते कापत होता . त्याच्या हाताला रक्त लागलं होतं .
” हं …. “
त्याने रक्त लागलेलं बोट पुढे केलं आणि अलगद तिच्या तोंडात घातलं …. नीलिमा आता तापली होती !
अंतर्बाह्य पेटून उठली होती .
अंगावरची वस्त्र धुडकावली आणि त्याच्यावर तुटून पडली आणि … तो तिच्यावर ….
To Be Continued ….


ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE & BGSAM PRODUCTION ,BHUTATMA PUBLICATION




