धलडा | अहिराणी भयकथा | Dhalda | Ahirani Bhaykatha |

                                        – धलडा –

                                                              अहिराणी – भयकथा

 

मराठी भयकथा

 

Author - Yogesh vasant borse

    माले अजून तो दिस आठवस …..

 एक सावा काय झायं ? …..

   असाच पावसाळाना दिस होता. मी अन मना धाकल्या पोऱ्या गाव जायेले व्हतूत !

 तसं गाव कई भलत दूर नई होतं हायी आठे जोडेच मनी धाकली बहिन देल शे ! तीना आठे जायेल व्हतूत !  दिन भर थांबनूत !

  मना पोऱ्या भलता खूश होता. त्याले आत्यानं घर गैर आवडे !

 तो निगाले तयार नई तशी मनी आक्का बोलनी 

“दादा त्याले आठे च राहू देना,  ऱ्हाईन मन जोडे  काई वाटनं  तं मी फोन करसू …..!”

“का रे गणू ? ऱ्हाशीन का ?” 

 पोऱ्या कुदाले लागना !

 काय त्याले मजा वाटे त्यालेच मालूम.

 मी तधाइन निघनू  अन रात व्हावाना पहिले घर पोहोचनू ! तशी मनी बाई माले इचाराले लागनी,

 “आओ, गणू कथाय …?” 

मी सांग “तो तठेच थांबना!”

 “अहो काय तुम्ही बी ? तो रातले रडी उठस  ,अक्का बाईले त्रास दिन तो रातभर! माले एक फोन तं करतान ? “

“जाऊ दे उकाव !

 काई करेल ए का ? माले गैरी भूक लागेल ए ! “

 आम्ही जेवण करं ! मी भाईर उनू ! ते बठ्ठा गाव मा अंधार भुस्स !…..

  मी इचार करावे लागनू….! आपला गांवमा या रोडवर लाईटे कव्हय  लागतीन ?

  शहरेस्मा कसा जगमग लाईटे राह्यत? मंग का आपल्या ग्रामपंचायत पान इतला पैसा नई ए ? की दोन चार तरी लाईटे लावतीन म्हणून ?….

पन  सांगीन कोण ? अन ऐकी कोन  ? मी तसाच इचार करत खाटल्यावर बशी ऱ्हायनु अंधारामा देखत ! तं माले असं वाटणं का कोनी मन घर कडे इ ऱ्हायना  म्हणून ! कोणी धलडा  होता असं वाटे ! त्याना हातमा काठी होती…..

 इतलामा दोन चार टपोरा थेंब मन अंगावर पडनात ! मी वर देखं त, डोया वर  बी पानी ना थेंब पडनात ! मी उठनू ! खाटलं उचलीसन पत्राना खाले टाकं , अन तठे बठनू ….. !

अन अचानक मनी ट्यूब पेटनी ! 

“अरे…?  तो धलडा कथा गया ? ” 

मी चारी बाजूले देखं पण त्याना  पत्ता नई ! ….

जाऊ द्या अशीन कोनी  ! पन  तो आपल्या घरकडे कसाले येत व्हता ?

 तितलामा हाई आवाज देवाले लागनी ,

“आओ? अकरा वाजी  गयात …? जपानं नई ए का ….?”

”  जपसू व !  जराशी दम मार….!…. नईतर आसं कर ,तू बी इसन मन जोडे बस ! पाऊस इ ऱ्हायना ! गैर भारी वाटी ऱ्हायनं ….!”

……तीना बी मूड बदलेल व्हता ! आमना गणू चार वरीसना व्हता !

 पन  जसा तो उना ,तवय पासून मन जनी नं बठ्ठ ध्यान त्यान कडे ऱ्हाय !…. मन कडे देखाले तिले टाइमच नव्हता ….! मी बी जास्त कई ध्यान नई दिधं  ….! इचार करा,

त्या धाकल्या पोऱ्याले तीनी जास्त गरज ए …. !

पन आज आमीच व्हतूत ! ती अन मी ! … 

 आज मी डोकं वापरं….’ म्हटलं आजना चान्स सोडाना नई.’……

जसा इचार उना तसा घरमा पयनू …..!

 “आ ओ …? काय झाये ? “

” …थांब ,….” 

 मी घरमा उन्नू तशी ती बी घाबरीसन मन कडे उनी ! मी दरवाजा बंद करा ! अन बायकोले लीसन झावर मा घुसनू …

भाईर हाऊ पाऊस जोर मा पडत व्हता ….अन घर मा हाई वादळ उठेल व्हतं….!

….रातले कव्हय तरी मोबाईल बोंबलाले लागना ,तसा उठीसन बठनु ,अन कपडा घालात …!

 अन देखं तं फोन आक्का ना व्हता ….!

 रातले दोन वाजता फोन…. ?

” जनी …उठ… ! …आक्का ना फोन ए ….! “

 ती बी घाबरीसन उठनी !

 ” तरी मी तुमले सांगं ,गणू तठे ऱ्हावाऊ नई म्हनून…..” 

“थांब त खरं ….देखू दे काय म्हनस ते ? “

मी फोन उचला ….

“आक्का -“

 “दादा गणू गैरा  रडी ऱ्हायना… मायकडे जावा नं म्हनस ! मी त्याले समजाडी ऱ्हायनु की सकायले जाऊत , पन तो ऐकाले तयार नई ! या बी घर नई ए त अन पाऊस इतलं जोरमा ए, की काय सांगू ! कसं करानं आते….?….”

“आक्के , तू घाबरू नको…! आम्ही येतंस…!  फोन गणू जोडे दे …”

तिनं फोन गणू पान दिधा तर तो जोर मा कोकलाले लागना….  तसा मी फोन जनी ना पान दि दीधा , ती त्याले उगा कराले  लागनी !

 पन  तो  जनी ना आवाज ऐकीसन अजून जोर मा कोकलाले लागना !… जनी बी घाबरी गई अन आक्का बी…!

” गणू ,हाय देख आम्ही तठे इ ऱ्हायनूत , तू रडू नको…..! ” 

  मी इचार कराले लागनू ….

 ” का ओ…. ? कसं काय करानं आते !….”

 ”  त्याले तं  सांगं ? आम्ही इ ऱ्हायनुत  म्हणून, पन  जावा नं कसं ?  न गाडी न घोडी…? पानी  इतलं जोरमा इ ऱ्हायनं  ! काय पाऊस शे का मजॅक ….?

“चाल…, छत्री ले अन घोंगडी ले….! गाडी भेटनी तं… ठीक नई त मग पायपाय निघूत….! आठे थांबिसन काई होवाऊ नई….!” 

 जनी बी निंगनी मन संगे ! मी आंगवर घोंगडी  लीधी , अन जनी छत्री लीसन निंगनी ….!

“आखो एक  घोंगडी ली ले , या छत्रीना काई भरोसा नई ! वारा वावधान मा उडनी तं काय करानं…!…..”

आम्ही निंगनूत , दार लावं ,रस्तावर ऊनूत, एक गाडी दिशेना ….!

 “आओ कोनी गाडी लेतात तं बरं व्हतं…. !”

” जनी इतला रातले कोना घर जावानं भीक मांगाले …., बरं दिसंस का ….?

 चाल,… देवले कायजी ऱ्हास ,… तो करी आपल्यासाठे काइ न काइ…!”

 आमी बागे बागे रस्ता धरा ……!

मझार एक नदी लागे ! तिले गैरं पानी व्हतं .. आमी कसातरी … पूल जोडे पोचनूत  तं हायी पानी त्या पूल वरतून …!

 “जनी आते काय करानं.. ..? इतला पानी  मां कसं जावानं ?

 आपलं ध्यानामा है कसं ऊनं नई ..? “

 जनी रडाले लागनी ! 

“तरी मी तुमले बोलनू व्हतू ! तो तठे रावाऊ नई म्हनून ,….तवयच निंगतून त आतलोग तठे राह्तूत …! “

तितलामा मनं ध्यान आमना मांगे गयं …… बैल  गाडी ना आवाज येत व्हता , बैलसना गया मा ती घंटा ऱ्हास ना ,तीन आवाज …..

! बैलगाडी येत व्हती ! 

“जनी हाइ देख बैलगाडी इ रायनी….!”

 “आहो या टाइमले बैलगाडी उनी इतला पानी मा ? माले तं हाइ काइ येगळंच वाटी ऱ्हायनं ….! आपन एक करूत ,एरमेरना हात धरीसन जाऊत ! जे व्हावानं अशीन ते हुईन….!”

 आमी तसंच करं , एरमेरना हात धरीसन पूलवर तुन जावाले लागनूत …पन  पानी इतला जोरमा व्हतं की ते आमले दोघेसले फेकाले करे …. 

तितला मा बैलगाडी आमना पान उनी…!

 ” कोठे जाई राईनात ? “….

 … त्या बैलगाडीवर एक धलडा  बशेल व्हता ! आंगवर घोंगडी व्हती  !….

 पन  माले एक समजेना त्या धलडा ना डोया चमकत व्हतात !…

 ” जनी हाऊ कोन शे काय मालूम …? माले तर हाई भुताड वाटी राह्यनं !…. त्याना डोया देख कसा चमकी रायनात ?” 

“आओ चूप बठा ? काय माय बोलू नका ! मी त तुमले पहिलेच बोलनू होतू ! या टाइमले कोनता मानूस बैलगाडी लिसन फिरीन ?”

“… जनी… यानं ठीक शे पन  या बैलं ….? का या बी भुत शेतस… ?”

तितला मा आवाज उना !

 ” येवानंय का ? “

तशी मी बी हिंमत करी ,

“तुम्ही कथा जाई ऱ्हाईनात ?”

 “… तुमले  येवानं असीन तर चाला.. ! तुमले त्या बाजूले सोड देसा !”

पन आमनी हिंमत होईना !

तशी जनी बोलनी

 “…बाबा आमना पोऱ्या धाकला ए …! तो त्याना आत्याना घर तोफांड करी ऱ्हायना ! आम्ही त्याले लेवाले जात व्हतूत ! पन  या इतला पानी मा एक गाडी सापडाले तयार नई….!

तुम्ही आमले तठ्लोक  सोडशान तं बरं होईन …!”

तो धलडा आमना कडे देखाले लागना अन आमले बोलूना,

 “तुमले पटीन की नई माले मालूम नई…! पन तुमना पोऱ्या गुमान जपेल ए ….! तुम्ही बी घर जा अन सकाय लोक  वाट देखा …! पानी  उतरनं  की त्याले लेवाले जा  !…. जा घर जा….!”

“….नई बाबा तुमले जमीन तर आमले त्यासना घर लोक सोड  द्या ,नशीन जमत तर पूल पार कर द्या ,आमी  तथाइन  बागे बागे चालना जाऊत…!”

“जशी तुमनी मर्जी ! पन जर काई कमी जास्त झाये तं माले दोष देवाना नई ! पानी देखा कितलंय…!”

” चाला ! ” 

आम्ही दोघे कसा तरी बसूनूत त्यान गाडी मा,  अन बैलं  बागेबागे पानी मा पुढे सरकाले लागनात…! थोड पुढे गयूत तं पानी वाढाले लागनं. आमले समजेना हाइ बैलगाडी इतली उच्ची ए ,चाके पूरा बूडी हायनात ! पानी  असं आंगवर  येत होतं ….आमी एरमेरले पकडीसन बसनूत …. जे होईन् ते होईन !

पन आमनं नशीब चांगलं व्हतं की आमी  सुकरूप दुसरा साईडले  पोहोची गउत ! पन धलडा थांबना नई !….

….. तो आमले आक्का ना घर न पान  सोडीसन चालना गया !….

जनी दरवाजा ठोकाले लागनी

“आक्का बाई ! ओ आक्का बाई “

 तसं आक्काने दरवाजा खोला .

” दादा…? वहीनी…? इतला पानी मा ऊनात…?  काय झायं…?…”

 आमले समजेना हाई अशी काय बोली राह्यनी?

” आक्का ? अशी काय चावयस ?….. तूच फोन करा ना ,की गण्या रडी ऱ्हायना..? तोफांड करी ऱ्हायना म्हनून …? “

” काय दादा ? ….मी कसाले फोन करु…? तो तं कव्हस्ना जपेल ए , अन त्या बी जपेल एत ! मन सोन्या बी ! “

” पन तू तं सांगं व्हतं की दाजी घर नई म्हणून ? “

 ” हाय देख तूना फोन ? “

 मी फोन काढा ,तिले दखाडा  ! फोन मा पानी घुशेल व्हतं ! बंद पडेल व्हता ….. 

 “….बरं जाऊ द्या …! या मझार …या कपडा बदलील्या …मी थोडा चहा ठेवस ! …. बरं वाटीन ….!”

  मी अन जनी एरमेर ना तोंडकडे देखा ले लागनूत…..तो धलडा …?

 तो , बोलंना व्हता… !

त्याले कसं मालूम….?

 पन मं आमले फोन उना त कोना ?

 बोलंनं त कोन ? 

अन रडनं त कोन ?

…. ते अजून समजत नईये ….!

टीप :- मित्रांनो ,तुम्हाला काय वाटतं ? नेमकं काय झालं असेल ? नक्की सांगा .. तोपर्यंत .. काळजी घ्या .. स्वतः ची ,आपल्या लेकरांची .. ! 

                                            The end

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top