गांवकडल्या गोष्टी – भाग-२ –


अहिराणी भयकथा ! मराठी भयकथा |
टीप :- मागील भगत आपण एक कथा ऐकलीत , त्या बाबांची गोष्ट संपली आणि ..
“आज आम्ही घेऊन आलो आहोत एक भयंकर अहिराणी भयकथा जी आबांची गोष्ट सांगते…”
त्यासनं बोलनं झायं , अनं दुसरा धलडा बोलाले लागना,-
“अरे पका, हाइतर काइच नई …! मी जे देखं ते तू ऐकशीन तर तूनी एवढी मोठी फाटी जाईन….!”
तसा बाकी दोघे बी इचाराले लागनात
“काय रे भो आबा…. ?” अनं आबा गोट सांगाले लागनात !……..
“ते मंडई, त्या रोज आमना गावमा समदा एकच गोष्ट चावयेत , की गांव मा तमासा येवाव शे म्हणून ! .. .. आते मले कई त्यामा इतला इंटरेस्ट नव्हता ! म्हणून मी काई ध्यान दीधं नई! मले गांवले जानं व्हतं, तर मी मना मना निघनू ….
पूरा दिनभर जितला कामे होतात तितला आवरात , अन संध्याकायले तठे बस स्टँडवर पोहोचनू , त बसना पत्ता नई !………
बस ये तठलोक अंधार पडी गया! मी इचारं कंडक्टरले ….
“का रे भो….? इतला टाइम…..?”
त तो मले बोलना, “काय करतंस नाना, गाडी शे ! काही माही काम काढस ! त्यामा काय टाईम झाया, पत्ता लागना नई!”
“चला ,बठा …. लवकर !…..”
जितला लोकेसले येवानं होतं त्या बसनात अन आमनी बस निघनी !
आबानी गोट: रात्रीचा तो थरार
मी खिडकीपान बशेल होतू ! गार वारं लागनं तसा डोया लागनात ! अन काय झाये काय मालूम?
घुंगरुसना अन ढोलकीना आवाज येवाले लागना….! मी काई ध्यान नई दिधं! मले वाटनं कोनी गाना बिना लावा असतीन !…..
मंग गांव उनं , तसा मी उतरी गवू …. चारी बाजूले देखं ,….. बठ्ठ अंधार भुस्स….. !
‘साला, कीतलाक वाजनात काय मालुंग ? ‘
घड्याय देखाले लागनू तं ते बी दिशेना ….!
बठ्ठा अंधार अन भयान शांतता…… !
तसं काई मले भ्याव वाटानं कारन नव्हतं ! कारण रस्ता पाय खालना होता. मी मना मना इचार करत करत घरकडे जावाले लागनू !
अन मना कान वर बैल गाडीना आवाज येवाले लागना !
बैलनी घंटाना आवाज येवाले लागना !
मले वाटनं चला, चांगलं झायं ! याना संगे चालना जाउत …. ! मी तठेच थांबनू…. !
बैलगाडीनी वाट देखत ! पण गाडी काई दिशेना ! फकस्त आवाज जोडे जोडे येत व्हता !
पन , ना बैलगाडी होती ,ना बैलं ….! मन ध्यानमा उनं ! हाई काईतरी येगळंच शे !
मी तथाइन निघनू अन जोरमा चालाले लागनू ! तितला मा छमछम आवाज करत कुणीतरी तथाइन पयनं!
मी आवाज दिधा –
” कोन शे रे ? ….”
पण फकस्त बाईना बारीक हसा ना आवाज उना बस !….
पिंपळाच्या झाडाखाली ती बाई
आते मले भिती वाटाले लागनी !…..
” आज कई खरं नई गडा…… ! “
घर भी पोहचूत की नई काय मालूम ?
मी जोरमा पयाले लागनू !…..
तं आवाज उना ढोलकी ना … ! मी तठेच थांबनू…! अरे हाऊ काय तमासा ए ….?
अन मना ध्यानमा उनं की गांवमा तमासा येणार व्हता !…..
मले मन मन हसू उनं ! अरे काय गडा !
आपन बी कितला घाबरतस …..! मना मना चालाले लगनू !
.…. पुढे पिपयना झाड जोडे ….एक बाई उभी….. !
मोक्या केस ….. काया भोर डोया …. !
अन कायी साडी होती का काय…. ते समजेना….!
बस्स, मी जस्सा त्या पिपयना पान पोहोचनू , तिनं ध्यान मनकडे गयं….! .
.. मना सात गयात … अन पाचच रायनात…..!
तिना कपाळवर मोठ्ठ कुंकू लायेल व्हतं ! जीभ अक्षी लाल जरत…..!
….. अन हात मा तेल ना दिवा …..!
मले समजेना, आते काय करानं….?
पायतं पुढे निघेनात !….
थरथर करेत….!
ती मले इचाराले लागनी,
” तू आठे कसाले उना…. ? “
मी काय बोलनार ?……
तोंड ते उघडाले पायजे …..!
” ….मी तुले इचारी ऱ्हायनू, तू आठे कसाले उना ? आज सोडी ऱ्हायनू, काल दिन दिसनां, ते जित्ता ठेवणार नई ! जाय निंघ लवकर !……”
मले काय झांय काय मालूम ! …..
मी जोरमा पयाले लागनू ! कसातरी घर पोहोचनू …..
मायले काय सांगनार ?…….
तिले वाटे ….आपला पोऱ्या जवान शे……! पैलवान ना गत दिसस …! याले कसानी भिती ?
कसा तरी दोन घास खादात !….अन जपी गवू …..
अन डोळा लागनात … तोच आवाज परत येवाले लागना ….!
त्या बाईना छुमछुमना …अन ढोलकी…
मी कूस बदली ….ध्यान खिडकी मागं गयं….!
…..त ती बाई मन खिडकीना बाहेर फिरत हती ! मी मायले आवाज दिधा !
” माय देखतं, खिडकी पान कोन बाई शे ते.. !”
मायले बी वाटनं कुनी अशीन म्हणून ! ती उठिसन देखाले लागनी ! दरवाजा बी उघडीसन देखा !
“बाज्या , जप…..! कुनी बी नई शे आठे….!….”
” …माय, तू बी कमाल करंस….! ती देख खिडकी…मा ….”
“बाज्या , तू का डोकावर पडना रे ? का पिसन उना ….? आठे कोनी नई….!”
मले समजेना, हाई काय नाटक ए भो ?
मले दिखस अन मायले नई म्हनजे …?
हाई शे तरी कोन?…… भुताडं ते नशीन?
मी पंघरी ऊंघरी जपी गऊ …! …….
तमाशाचा भयंकर सस्पेंस
सकायले उठनू …..! बठ्ठ आवरं.. ! अन चावडीवर गऊ !…..
तठे आपला राम्या अन त्या बशेल व्हतात !…. त्यासले सांगं ,की रातले गांवमा तमासा येलशे म्हनून ….. तर त्या मले हसाले लागनात …..!
” बाज्या , तू का चगी उठना रे…. ?
अजून आठ दिन बाकी हेतत ! जतरा व्हई ,तमासा तवयच इ ना ! आते मझार तूना बाप त्यासले पैसा देवावू शे का?”
मी इचार कराले लागनू……! तसा राम्या मले बोलना,
“बाज्या ….. काय झायं ?”
“काई नई…..?”
” बाज्या , खरं खरं सांग ,काय झांय ते …..! तू ना थोबाडावर बारा वाजेल शेतस……!”
मी राम्याले बठ्ठ सांगं जे जे झांय ते….!
….तो बी इचार कराले लागना…..! मी त्याले इचारं,
“राम्या मले एक गोट समजत नईए, ती बाई मन मागे मागे मन घर कसाले उनी….?
आन ती पिपयना झाड खाले दिवा लावत होती, ती कोण होती.. ?”
“बाज्या , तू असा फिरत जाऊ नको गडा ! या रातना टाइमाले कई मई फिरतस ! आपले काय मालूम ? …..”
मी राम्याले बोलनू,
” .. राम्या आपून आज रातले तठे जाऊत , अन देखूत , तू मन संगे चाल जो….!”
पण राम्या ऐकाले तयार नव्हता……
” नई रे भो, तठे जाईसन काय मरनंय का ….? या रातन्या चुलडीनी फिरत असतीन…..! तुले कई काम धंदा नई ….! तू जाय….! मले नको यामा गुताडू !…..”
इतलं बोलिसन राम्या चालना गया……!
तितला मा तठे आपला दिगंबर तात्याना सुरेश उना…..! मी त्याले इचारं,
” का रे सुरेश, आपला गांवले म्हने तमासा येणार शे….?”
….तो मनकडे देखाले लागना…!
“… येणार व्हता गडा !… येणार व्हता….! ….आते नई येणार…..! “
“काहून रे…?”
“अरे ती नाचनारीन मरी गई ना…..!”
” काय…? ….”
“अरे तून कान मा काय जायेल ए ? मी सांगं ती नाचनारीन , मरी गई….!”
” कवय….?…”
“…काल दिन मरनी….ती ….! “
“अरे अशी कशी मरनी…? “
” आते मले काय मालूम कशी मरनी ते!”
नाचनारीन आणि ढोलकीवाला
…..बठ्ठा गांवमा गाडी फिरत होती तमासानि !
अन त्या गाडीवर त्या बाईना फोटो होता !
मी सुरेशले इचारं,
” सुरेश ही बाई येणार व्हती …?”
” हाव….! “
” अरे हाईतर मले…..काल रातले भेटनी …..! अन मन घर बी येल व्हती…..!”
सुरेश जोर मा ओरडना,
” काय सांगस….? “
“अरे मी काय खोटं बोलसू का ?…”
मी सुरेशले बठ्ठ सांगं! जसं झांय तसं!…..
इतलं सांगिसन आबा शांत बठना ! पण पोरेसला दम निघेना !
” आबा मगं काय झांय…? ते त सांगा….”
“नका इचारू गडा….!”
” रात ना टाइमले गांवमा ती बाई लोकेसले दिसाले लागनी ! कवय हाई गल्लीमा, कवय ती गल्लीमा….!
लोके रातले बाहेर निघाले घाबराले लागनात !…”
” मंग….? “
” मंग काय ?…. जतराना दिवस उजाडना ! बठ्ठ गांव जतराले जमा व्हयनं ! कुनी पोऱ्या पिपानी वाजे…! कुनी भोंगा वाजे….! असं करता करता रातना अकरा साडे अकरा वाजनात….! अन तितला मा ढोलकी वाजाले लागनी….! लोकेसले वाटे कुनीतरी वाजत अशीन! ….
….पन जवय ढोलकीना आवाज जोडे जोडे येवाले लागना,…. लोके घाबराले लागनात ! कारण ढोलकीवाला दिसाले तयार नई !…
तितला मा ढोलकीना आवाज बंद झाया….! बठ्ठा लोकेसले कसं आंगवरून वारं जायेल होतं…..
कुनीबी एक सबूत बोलाले तयार नई….!
इतला लोके, पण भयान शांतता…..!
जो तो घाबरीसन इचार करत व्हता….. आते पुढे काय होणार म्हणून….!
तितला मा छुमछुम आवाज येवाले लागना. लोके जोडे जोडे सरकीसन एरमेरना हात धराले लागनात…!
अन तुमले काय सांगू भो….!
जसा बारा वाजनात तशी नाचनारीन अन तो ढोलकीवाळा बठ्ठा गांवना सामने दिसाले लाग नात …!
ढोलकीवाला ढोलकी वाजाडे अन ती नाचनारीन जोरजोरमा नाचे ….!
….नाचता नाचता ती हसाले लागनी. बाल मोकळ्या सोडात ! अन लोकेसकडे देखाले लागनी…!
मनी ट्युब पेटनी, ….अरे…! हाईतर तीच शे….! त्या पिपयना झाडजोडे दिवा लावणारी….!
ती मनकडे देखीसन बोलनी,
” तुले त्या दिन सांगं व्हतं ! माले दिखजो नको म्हणून….! पन तू मन ऐकं नई आं …?”
ती इतलं बोलनी !
मी जो पयाले लागनू ,मन देखीसन लोके बी पयाले लागनात ….!
बठ्ठ गांव पयाले लागनं……
कोन कुठे पये, कोन कुठे पये !…..
अन नाचनारीन जोर जोरमा हांसे!
“मन सुपारी द्या…! मन सुपारी द्या म्हने…..! “
कथेचा भयानक शेवट
इतलं बोलिसन आबा शांत बठना !
थोडा वेळ कुनीच काई बोलनं नई ….! त्यामा एक पोऱ्या होता जवान ! निंबाजी ,तो बोलना –
“आबा, तुमी काई बी चावयतस ! असं कोठे-हास का…? तुमी आते घर जा ….”
“….नई, मी घर जावावू नई…..”
आबा खाली मान घालीसन बोलना !….
“काहू ?”
” ती बाई रोज रातले मन घर जोडे येस अन मले सांगस….!”
“काय?”
” चल गडा आपन सुपारी लेवूत ….!”
“तुमले का सांगस पन ?”
“…कारन…. तो ढोलकीवाला …. मीच ए ….!”
इतलं बोलिसन आबा जोरजोरमा हांसे लागना…..!
अन….. गायब.. झाया…..!
……अन तठे जितला लोके बशेल व्हतात, बठ्ठा पयी गयात….!
कुनी या आंगे ,कुनी त्या आंगे …. पया भो .. काई खरं नई ..
तं मँडई सांगांना अर्थ असा की , असं रातना टाइमले, झाडना खाले गप्पा मारत बसांई नई !
आनी, जरी बसनात तरी चेक करी लेत जा, बठ्ठा जीत्ता शेतस ना….!
नाई तर हे आसं …. होस….!
काई कयनं का नई ?
नई …..?
जाऊ द्या मंग गडा , तुमनी मर्जी ….!
राम राम… मी बी जास ….. !


