बारक्यानं भूत | barkyana bhoot | मराठी अहिराणी भयकथा | MARATHI HORROR STORY| Yogesh Borse

-: बारक्यानं भूत :-
अहिराणी भयकथा :- लेखक -श्री . योगेश वसंत बोरसे . 
 ” बारक्या , ए बारक्या , कथा गय था ? ” 
 “मी ? अरे मी वावर मा गय थू ! ” 
“वावर मा ? वावर मा कसाले ? ” 
“अरे पक्या, वावर मा कसाले जातस ?”
 “अरे ,कोनी हागाले  जास ! कोणी पेराले जास ! कोनी कामले जास ! तू कसाले गय था ? “
  “मी चक्कर माराले गय थू ! “
“अरे ,बारक्या , तू का चगी उठना रे ! हाऊ का फिराना टाइम शे का ? “
” अरे ,असं रातले फिरानं नई ! रात न्या चुलडी नी फिरतीस ! त्यामा आज अमावस शे !काही कमी जास झाय मंग ? ” 
“अरे पक्या ,असं काही ऱ्हास का ? अरे हाऊ बठ्ठा आपला येडा चाया शेतस ! अरे लोकस्नी एकटं दुकट फिरा ले नको त्यासाठे हाई भीती घालेल शे !” 
 “बरं पक्या ,मले एक इचारानं होतं .  असं म्हनतस की या भुतेसना पाय उलटा रहातस म्हने ?’ 
“अरे मंग गडा ! तुले काय म्हाईत नई का काय ? पण तू असं का इचारी ऱ्हायना ? ” 
   ” अरे ,आमना वावर पान एक मोठ्ठ झाड शे , पिपयनं ! तठे बसा ले बी जागा करेल शे ! की ,बुवा कुनी चालिसन थकनं तर तठे गांड टेकीं म्हनून !”
   “मंग रे ?” 
  ” अरे ,मी तथाईन येत व्हतू तर एक बाई तठे बशेल होती ! “
 ” बाई ? काय बात करस पका ? दिसाले कशी होती ?” 
 “अरे काय इचारू नको ! एकदम येक नंबर !” 
“मंग रे ?” 
“मी इचार कराले लागनू ! ईतली रात ले हाई आठे काय करी ऱ्हायनी ? ती बी एकली ? इले भ्या वाटत नई का ? ”  
“मी तिले इचारं बाई तुमी आठे काय करी ऱ्हायनात ? ते बी या टाइम ले ? असं रात ले एकटं फिरतस का ? ” 
” तर ती मले बोलनी ,मी एकटीच फिरस म्हने ! मले इचारे ,सरपंच ना घर जवानय म्हने ! मले घर दाखाडा ! ” 
“मले वाटणं ,बाईनं काई काम अशीन ! मी तिले रस्ता दाखाडा ,अन मना मना निघनू ! तून कडे येवाले !”
 
  ” मंग रे ?” 
 “अरे पक्या ती बाई मन मांगे मांगे येत व्हती ! तीना पायमा ते काय म्हनतस घुंगरू का काय ,ते वाजे ! ती छम छम करत मन मांगे चालाले लागनी ! ” 
” मी तिले बोलनू की बाई हाई काई चांगलं नई ! कोनी देखं तर मले लोके नांव ठेवतीं ! तुमि तुमना रस्ताले जा , मी मन रसताले जास !”
 “मंग रे ?” 
 “अरे काय इचारस गडा , मनं बोलनं ऐकिसन ती हसाले लागनी ! मन मांगे पुढे फिराले  लागनी ! ” मन ध्यान ती ना तंगड्यास कडे गय ! तर तीना पाय मले दिशेनात ! मले वाटणं ,अंधारभूस शे ,मंग कसाले दिशी ? मी तसाच पुढे चालाले लागनू  मन मांगे घुंगरूंसना आवाज येत ऱ्हायना ,अन अचानक बंद झाया ! मी मांगे फिरीसन देख तर ती गायब ! ”  
“अरे बापरे ,बारक्या अरे तू काय सांगी ऱ्हायना ?” 
 “अरे मंग पक्या मी काय खोटं बोलसू का ? “
 “अरे पक्या ती बाई नवती ! चूलडीन व्हती ! तुले काहीच वाटणं नई का ?” 
  ईतलं बोलीसन पक्या त्याना घर मा पयना  ! अन एक मिरची लीसन उना !
 ” बारक्या हाई ले ,हाई मिरची खाईसन देख ! “
  बारक्यानं मिरची लीसन तोंड मा टाकी !अन कच काच खाई लीधी !
  हाई देखिसन पक्या आते घाबरी गया ! 
” बारक्या ,ती चुलडिन गायब नई झाई ? ती तुना आंग मा घुशेल शे !” 
 ” ए पक्या ,अरे तू काय सांगी  ऱ्हायना ? मंग आते तिले बाहेर कसं काढानं ? ”  
 “मले काय मालुंग ? तू कसाले झक माराले  तठे फिरत व्हता ? आते काय करानं  गडा ? तू चाल मन संगे !  ” 
“कोठे जावानय ?” 
“ते नको इचारू !” 
दोघे निघनात ,अन पक्यानं ‘ राम राम  राम राम ‘ सुरु झाय ! बारक्या त्याले इचारे कोठे जावा नय म्हनून ,पन पक्या काई बोलना नई ! तो जोर मा चालाले  लागना ! 
  त्या एक झोपडी पान उनात ! ” बारक्या ,थांब आठेच ! ” 
बारक्या तठेच  थांबना ! पक्या त्या झोपडी मा घुसना !  
पक्या दोन मिनिट मा एक बाबा ले लिसन उना ! 
” हाऊ देखा ,हाऊ शे बारक्या !  हाऊ तठे जायेल व्हता ! त्या पिपायना झाड जोडे ! तठे ती बाई भेटनी म्हने त्याले , नाचनारीन !तिले सरपंच ना घर जावानं होतं म्हने !” 
बाबा हसाले लाग गया ,”अरे मंग तू याले आठे कसा ले ली उना ?” 
“बाबा याना इलाज तुमीच करा !हाऊ अख्खी मिरची कचकच खाई गया ! ” 
 “काय ?” 
 “हाव ना ,मंग मी तुमले काय सांगी ऱ्हायनु ? ती याना आंग मा घुशेल शे ! तिले भायेर काढा !”                
  बाबा समजी गया ,हाऊ असा जावावू नई . 
“थांब जरा ! जरा दम मार ! ” 
बाबा मझार गया ,त्याना झाडू लई उना ! अन थोडी राख ! 
“पक्या ,त्याले आठे बसाड ! ” 
असं म्हनीसन बाबा ती राख बारक्याना अंग वर टाका ले लागना ! बारक्या ले  सहन झाय नई ! 
“बाबा ,तू का चगी उठना रे ? है काय फेकं मन आंगवर ?” बारक्या डोया चोळाले लागना . पक्यानं त्याना हात धरा अन त्याले झोपडीजवळ लै उना ! 
“बारक्या ,आठे बठ ! “
“पक्या ,मले सरपंच ना घर जवानय ,मी जास ! “
  “जाशीं रे ,आठे बठ जरा ! “
 पण बारक्याना डोया चुई चुई करत व्हतात !
 “पक्या ,मले पानी दे ! ”   
     “अरे ,आठे पानी कसाले भेटीन ?” 
   “अरे ,होऊ काय बिना पानी ना ऱ्हास का ? त्याले सांग ,पाणी दे म्हना !”  
बाबा ने त्यास्नं बोलणं ऎक “
“अरे पक्या ,जाय ,तठे इहिर शे ! पानी काढ ,अन याना डोकसा वर ओत ! “
पक्क्या पयत पयत गया अन ती बाल्टी त्या इहिर मा टाकी ! अन पानी उपसाले लागना ! बारक्याकडे त्यानं ध्यान नव्हतं ! बारक्या त्याना मागे ऊन था ! आन त्यानं काय कर ? तर पक्याले इहिर मा ढकली दिध !आन जोरजोर मा हसाले लागना ! 
“मले भायेर काढस का ?आते तुले कोन काढी ?”  
है देखीसन  बाबा त्यांना झाडू लिसन पै गया !
आन बारक्या तथाइन निघना ,सरपंचकडे जावा ले ! 
पक्या तर वर उना नई ! पन त्यानं भूत  त्या इहिर पान बशेल ऱ्हास !बारक्यानी वाट देखत !
पन बारक्या परत उनाच नई ! तुमले दिसना तर सांग ज्या बरं का !
‘राम राम !” ……
Bhutatma Publications

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top